



समाजासाठी आमची निष्ठा आणि संकल्प
मी आणि माझी संस्था समाजातील प्रत्येक गरजू व्यक्तीपर्यंत मदतीचा हात पोहोचवण्यासाठी कटिबद्ध आहोत. समाजात परिवर्तन घडवण्यासाठी आपण सर्वांनी एकत्र यावे, हातात हात घालून पुढे जावे आणि एक जबाबदार नागरिक म्हणून गरजूंच्या मदतीला धावून जावे, हेच माझे अंतिम ध्येय आहे

आमचे ध्येय
श्री कटील दुर्गा परमेश्वरी अन्नपूर्णा सेवा योजना
श्री कटील दुर्गा परमेश्वरी चॅरिटेबल ट्रस्ट अंतर्गत राबवली जाणारी अन्नपूर्णा सेवा योजना ही गरजू, उपाशी आणि निराधार व्यक्तींना मोफत, सात्विक आणि पौष्टिक अन्न देणारी सेवा आहे. या उपक्रमाचा उद्देश समाजातील कुणीही व्यक्ती उपाशी झोपू नये हा आहे. अन्न वाटप हे नियमितपणे विशिष्ट ठिकाणी व वेळेनुसार ट्रस्टच्या स्वयंसेवकांमार्फत पार पाडले जाते. ही योजना सामाजिक जबाबदारीचे प्रतीक असून, ‘सेवेतून ईश्वरप्राप्ती’ हा यामागचा खरा हेतू आहे
स्वच्छता अभियान मोहीम
स्वच्छता ही केवळ गरज नाही तर एक सवय असली पाहिजे. स्वच्छता राखल्याने आरोग्य सुधारते, पर्यावरण सुरक्षित राहते आणि समाज अधिक सुसंस्कृत बनतो. भारत सरकारने स्वच्छ भारत अभियान' सुरु करून संपूर्ण देशात स्वच्छतेबाबत जागरूकता निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे.
स्वच्छता ही केवळ सरकारची जबाबदारी नाही, तर प्रत्येक नागरिकाने स्वच्छतेच्या सवयी अंगीकारणे गरजेचे आहे. "स्वच्छ भारत - सुंदर भारत" ही संकल्पना प्रत्यक्षात आणण्यासाठी आपण सर्वांनी योगदान द्यावे. "एक पाऊल स्वच्छतेकडे!"
Our Achievements
Years In Charity
0
+
Volunteers
0
+
Number of causes
0
+
People Helped
1
lac+